दाभोलकर हत्ये प्रकरणी वीरेंद्र तावडेली 20 जूनपर्यंत सीबीआय कोठडी

June 16, 2016 4:06 PM0 commentsViews:

virendra_tawade

पुणे- 16 जून :  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात असलेल्या वीरेंद्र तावडे याला 20 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

तावडे याच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला आज (गुरूवारी) पुणे सत्र न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयात त्याला 20 जूनपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सीबीआयकडून तावडेचा कसून तपास सुरू आहे. तावडेला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याच्याकडून 2009च्या मेलशिवाय कोणतीहा पुरावा नसल्याचा, दावा तावडेचा वकील संजीव पुनाळेकर यांनी केला आहे. तसंच या प्रकरणात ‘सनातन’ संस्थेला गोवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे तावडेची कोठडी वाढवू नये, अशीही विनंती पुनाळेकरांनी केली होती. मात्र, तपासात डॉ. तावडे सहकार्य करत नसल्याचं सीबीआयकडून सांगण्यात आलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close