भारताला विशेष दर्जा देण्यास अमेरिकन सिनेटचा नकार

June 16, 2016 6:01 PM0 commentsViews:

Modi and obama

16 जून : भारताला विशेष दर्जा देणारं विधेयक अमेरिकी संसदेत संमत होऊ शकले नाही. संसद भारताला अमेरिकेचा विशेष जागतिक सहकारी म्हणून दर्जा देण्यास अपयशी ठरली. हे विधेयक वरिष्ठ रिपब्लिकन सिनेटरने मांडले होते. मात्र, सिनेटनं हा प्रस्ताव 85 विरुद्ध 13 मतांनी फेटाळला आहे.

अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनाच्या एक दिवसानंतर हे विधेयक सादर करण्यात आलं होतं. जर हे विधेयक संमत झाले असते तर भारताला अमेरिकेचा जागतिक रणनीतिक आणि संरक्षण सहकारी म्हणून दर्जा मिळाला असता. त्यामुळे भारताला अमेरिकेकडून संरक्षणविषयक तंत्रज्ञान मिळणं शक्य झालं असतं. याआधी बराक ओबामा आणि नरेंद्र मोदींनी संयुक्तरीत्या भारताला मोठा संरक्षण भागीदार करून घेणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, ती फोल ठरली होती.

दरम्यान, मॅक्केन यांनी यावर निराशा दर्शवित या संशोधनांना गांभीर्याने घेण्यात आले नाही असा दावा केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close