येत्या 24 तासांत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

June 16, 2016 10:23 PM0 commentsViews:

Bay-system-Main

16 जून :  आता पडेल मग पडेल अशी आशा दाखवत दडी मारलेला पाऊस येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्र आणि गोव्यावर बरसणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये येत्या 24 तासांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर, उद्या म्हणजे 17 पासून पुढील 48 तासांमध्ये कोकणामध्ये सगळीकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

येत्या 19 जूनपासून नंतरच्या 48 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची बरसात होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. केरळमध्ये आल्यानंतरम मॉन्सून रेंगाळला होता. त्याला आता वेग येत असून आठवडाभरात त्याचा पुढं सरकण्याचा वेग वाढेल असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे.

हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला, तर बहुतांश महाराष्ट्राची पाण्याची आस भागेल आणि जनतेला दिलासा मिळेल अशी चिन्हं आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close