राष्ट्रपती होण्याची आपली पात्रता नाही -अमिताभ बच्चन

June 17, 2016 9:16 AM0 commentsViews:

big b _on tigar17 जून : भारताचा राष्ट्रपती होण्याची आपली पात्रता नसल्याचं बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट केलंय. या पदासाठी अनेक पात्र उमेदवार आपल्या देशात असून हे पद भूषवण्याची योग्यता आपल्यात नाही. त्यामुळे याबाबत सुरू असलेल्या सगळ्या चर्चा या केवळ चर्चाच आहेत असंही त्यांनी सांगितलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतीपदासाठी अमिताभ बच्चन यांचं नाव पुढे करणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती.यावर शत्रुघ्न सिंन्हा यांनीही अमिताभ यांच्या नावाला आपला पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. मात्र बिग बी यांनी ते थट्टा करत असतील असं सांगत या चर्चेत तथ्य नसल्याचं म्हंटलंय. कोलकतातील एका दैनिकाला मुलाखत देताना त्यांनी आपली बाजू स्पष्ट केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close