मुंबईकरांसाठी महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा !

June 17, 2016 9:48 AM0 commentsViews:

मुंबई – 17 जून : मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये जेमतेम एक महिना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेच्या जलविभागातील अधिकार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सध्या प्रचंड उष्णतेमुळे तलावांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाऊस येईपर्यंत जपून पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

mumbai_water33मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणामध्ये गुरुवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार 1,12,432 दशलक्ष लिटर इतका जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तलावांमध्ये 1,89,060 दशलक्ष लिटर इतके पाणी होते. गेल्या वर्षी तुलनेत तलावांमध्ये तब्बल 76,528 दशलक्ष लिटर पाण्याची तूट आहे. सध्या मुंबईकरांना जेमतेम महिनाभर पाणीपुरवठा करता येईल इतके पाणी तलावांमध्ये आहे. मुंबईकरांना दररोज 3750 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र तलावांतील उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन गेल्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत 20 टक्के पाणीकपात करण्यात आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close