रवींद्र जडेजाची पत्नीसोबत सिंहांसमोर ‘फोटो’गिरी

June 17, 2016 11:37 AM0 commentsViews:

17 जून : भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा हा नुकताच गुजरातमधल्या गिर अभयारण्यात सुट्टीसाठी गेला होता. यावेळी जंगल सफारीसाठी फिरताना त्याने केलेलं फोटोसेशन त्याला चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे.

सफारी करत असताना कुणालाही गाडीतून खाली उतरून फोटो काढण्याची परवानगी नसते. मात्र जडेजाने गाडीतून उतरून अभयारण्यातील सिहांसोबत फोटोसेशन केलं.एवढंच नाही तर अभयारण्यातील कर्मचार्‍यांसोबतही त्याने फोटो काढले.सोशल मीडियावर हे फोटो अपलोड केल्यानंतर मात्र त्याबद्दल चर्चा सुरू झाली.

त्यामुळे गिर अभयारण्यात असं फोटोसेशन करायला परवानगी देणार्‍या वन कर्मचार्‍यांचीही विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, रवींद्र जडेजाच्या लग्नात सुद्धा नातेवाईकांनी हवेत गोळीबार केल्याची घडना घडली होती. एवढंच नाहीतर खुद्ध जडेजाच तलवार घेऊन नाचत असल्याचे फोटो समोर आले होते. यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा