धावत्या रेल्वेखाली आलेल्या प्रवाशाला पोलिसांनी वाचवलं

June 17, 2016 1:05 PM0 commentsViews:

पुणे – 17 जून : लोणावळा रेल्वे स्थानकावर धावत्या एक्स्प्रेस आणि प्लॅटफार्मध्ये अडकलेल्या एका प्रवाशाचा जीव आरपीएफच्या दोन कॉन्स्टेबल्सनी वाचवला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे.

lonavalaगुरुवारी दुपारी अडीचच्या सुमाराची ही घटना आहे. धावती ट्रेन पकडताना ही व्यक्ती रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या फटीत अडकली. आरपीएफच्या कॉन्स्टेबल्सनी प्रसंगावधान राखत लगेच त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. हे रेल्वेच्या गार्डनं पाहिलं. गार्डनं लगेच रेल्वे ड्रायव्हरला सतर्क केलं आणि एक्स्प्रेस लगेच थांबली. त्यामुळे या व्यक्तीचा जीव वाचला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close