मुंबई रस्ते घोटाळा प्रकरणी कंत्राटदारांवर कारवाई कधी ?

June 17, 2016 1:46 PM0 commentsViews:

 

मुंबई- 17 जून : मुंबईतल्या रस्ते घोटाळा प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा 10 लेखा परीक्षकांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या घोटाळ्यांना जबाबदार असणारे कंत्राटदार अजूनही उजळमाथ्यानं फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कधी होणार हा प्रश्न उपस्थित होतोय.mumbai_road_scam

हे लेखा परीक्षक खाजगी कंपन्यांचे होते. कंत्राटदारांनी दिलेली बिलं न पडताळताच ती महापालिकेला सादर केल्याचा आरोप या लेखा परीक्षकांवर आहे. या अटक सत्रानंतर महापालिका प्रशासनात खळबळ उडालीये. मुंबईतल्या रस्त्यांच्या कामांचा 352 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. त्याच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीने मुंबईतील 34 रस्त्यांची पाहणी केली होती. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, काम अपूर्ण ठेवणे यांसह अनेक गंभीर बाबींचा उल्लेख या समितीने आपल्या अहवालात केला आहे.

 कंत्राटदारांवर कारवाई कधी?

- मे 2015 ला मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकरांचं आयुक्तांना पत्र
- रस्त्यांच्या बांधकामामध्ये घोळ असल्याची माहिती
- रस्ते बांधण्यासाठी जुना रस्ता व्यवस्थित खोदावा लागतो.
जो न खोदताच कंत्राटदारांनी त्याचे पैसे घेतले, असा महापौरांचा आरोप
- महापौरांच्या पत्रानंतर आयुक्तांकडून चौकशीचे आदेश
- बीएमसी अधिकार्‍यांनी 34 रस्त्यांच्या पाहणीत
- रस्त्यांचा दर्जाही चांगला नसल्याचं निदर्शनास
- डिसेंबर 2015 ला चौकशी समितीने दिला प्राथमिक अहवाल
- 34 रस्त्यांच्या बांधकामासाठी 354 कोटी रुपये खर्च
- यानंतर याच रस्त्यांचा सखोल चौकशी अहवाल
- रस्ते बांधकाम करणार्‍या 6 कंत्राटदार आणि 2 लेखापालांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- पालिकेच्या दोन मुख्य अभियंते निलंबित
- अखेरच्या अहवालात बीएमसीचा हा घोटाळा 354 कोटींचा नसून 14 कोटींचा असल्याचं उघड
- कंत्राटदाराला चौकशी पूर्ण होईपर्यंत कुठलीही रक्कम देऊ नये असे आयुक्तांचे आदेश
- अखेर 15 जूनला 10 लेखापालांना घोटाळ्या प्रकरणी अटक


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close