मायनिंगची पंतप्रधानांकडून दखल

April 1, 2010 8:36 AM0 commentsViews: 2

1 एप्रिल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मायनिंग संदर्भात तयार करण्यात आलेला पर्यावरण अहवाल चुकीचा असल्याच्या तक्रारीची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे.पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशानुसार इंडियन ब्युरो ऑफ माईन्सचे अधिकारी सिंधुदुर्गातील असनिये गावात दाखल झाले आहेत. गावकरी, संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि पर्यावरण तज्ञ्जांना सोबत घेऊन या गावातील जैव विविधतेची पहाणी करण्यात येत आहे. या पाहणीचा अहवाल ताबडतोब पंतप्रधान कार्यालयाला सादर करण्यात येणार आहे. आणि या अहवालानुसार असनिये गावात मायनिंग संदर्भातील परवान्यांचा फेरविचार केला जाणार आहे.

close