लालू, राबडीदेवींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

April 1, 2010 8:43 AM0 commentsViews: 1

1 एप्रिल माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपती प्रकरणी त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. खालच्या कोर्टाने यात लालूंना निर्दोष जाहीर केले होते.पण या निकालाच्या विरोधात बिहार सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण अशा प्रकारचे पाऊल उचलण्याचा सरकारला अधिकार नसल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने लालू आणि राबडींना दिलासा दिला आहे.

close