…आणि कासवाला बसवली चाकं !

June 17, 2016 4:14 PM0 commentsViews:

17 जून : चेन्नईमध्ये एका कासवावर एक आगळीवेगळी शस्त्रक्रिया करण्यात आलीय. दुसर्‍या एका प्राण्याच्या हल्ल्यात या कासवानं एक पाय गमावला होता. त्याच्या शरीरावर आता दोन छोटी चाकं बसवण्यात आली आहेत. एका वेगळ्या केमिकलनं ही चाकं लावण्यात आली आहे. त्यामुळे कासवाला चालण्यात खूप मदत होतेय. शस्त्रक्रिया पूर्ण होताच कासव व्यवस्थित चालू लागलं. आणि आता तर ते संपूर्ण प्राणी संग्रहालयात सर्वात जास्त वेगानं चालणारं कासव ठरलंय. डॉ. बून ऑल्वीन यांनी ही शस्त्रक्रिया केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close