पावसाळ्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज होताना तुमच्या घराची अधिक काळजी घेणे आवश्यक का ठरते?

June 18, 2016 6:24 PM0 commentsViews:

उन्हाळ्यातले घामेजलेले, थकवणारे दिवस पहिल्या पावसाच्या सरींनी टवटवीत झाले आहेत… तनामनाला आल्हाददायक वाटणाऱया या दिवसांत तुमच्या लाडक्या घरात मात्र ओल वाढून अनर्थ होऊ शकतो…
पावसाने फरशा अस्वच्छ होण्यापासून फर्निचर ओलसर होईपर्यंत सारा घोळ वाढत असतो. ओलसरपणामुळे केवळ तुमच्या भिंती आणि फर्निचरचीच दुर्दशा होते असे नाही तर तुमच्या कुटुंबांचं आरोग्यही धोक्यात येतं, मात्र ढगांची दाटी होतानाच थोडी तयारी केली तर तुमचं आरोग्य आणि तुमचं घरही सुरक्षित राहू शकतं.

फर्निचर
पावसाळ्यात लाकडी फर्निचर फुगून खराब होण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे पावसात लाकडी फर्निचर शक्य तेवढे टाळा. लाकडी तसेच धातूचे फर्निचर खिडकीपासून लांब ठेवा, म्हणजे त्यांना ओल लागणार नाही. पाऊस पडत असताना लाकडी फरशा अथवा लाकडी दरवाजे ओल शोषून घेतात, त्यावर उपाय म्हणून तुम्ही त्यावर मेण लावू शकता आणि त्यामुळे जास्तीची ओल येणं रोखता येऊ शकेल.
जर घरी लेदर सोफा असल्यास पावसाळ्यात त्याला बुरशी येऊ नये, म्हणून तो नियमितपणे स्वच्छ करा. पावसाळ्यात भिंतींना ओल धरत असल्याने घरातील वॉर्डरोब आणि कपाटे भिंतीहून काही इंच दूर ठेवा.

गळती आणि गंज
सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम म्हणजे तुमच्या घराच्या छपराची दुरुस्ती करा. प्लंबरला बोलावून तुमच्या घराचं छप्पर आणि सिलींगची तपासणी करून घ्या. जर ती नीट नसेल तर तुमच्या सिलींगवर पाण्याचे छाप उमटतात आणि ते तुमच्यासाठी दु:स्वप्न ठरते!
पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तुमच्या घरासमोर गटाराची व्यवस्था आहे का आणि त्यातून पाणी वाहून जाईल, याची खातरजमा करून घ्या.
तुमच्या न्हाणीघराच्या टाइल्स नीट बसल्या आहेत हे तपासा आणि धातूचा दरवाजा, खिडकीच्या फ्रेम्स यांना गंज लागू नये म्हणून त्यांना नवा थर लावण्याची आवश्यकता असते, हे ध्यानात घ्या.

कीटक आणि वाळवी
पावसाळ्यात, घरी कारपेट वापरू नये. फरशीवर अवजड रग वापरण्याचेही टाळा. कपड्याऐवजी पाणी शोषून घेणारी बांबू अथवा रबर मॅट वापरा. पावसाळ्यात खिडक्यांवर जाडसर पडदे ओढून ठेवू नका. कपाटात ओलसरपणा शोषून घेणारे नॅप्थेलीन बॉल्स ठेवा.
एअर कंडिशनरमुळे बाहेरील भिंतींच्या पृष्ठभागावर पाण्याचे ठसे उमटताना दिसतात. या रेषा म्हणजे शेवाळे वाढण्याच्या पूरक जागा असतात. बुरशी येऊ नये, म्हणून कडिनिंबाची पाने उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे तुम्ही सिलिका जेल पाकिटेही खरेदी करू शकता आणि तुमच्या बुटांमध्ये अथवा बॅगमध्ये ओल न राहण्यासाठी त्यांची मदत होते.
तुमच्या घरातील सजावटीच्या वस्तू नीट राहाव्यात, म्हणून तुमच्या घरातील एअर कंडिशनर आठवड्यातून एकदा अथवा दोनदा डिह्युमिडिफायर मोड अथवा ड्राय मोडवर दोन तास सुरू ठेवा. त्यामुळे तुमच्या सजावटीच्या वस्तूंमध्ये ओल जाणे टळू शकेल.
खोबरेल तेलात कापसाचा बोळा बुडवून तो बोळा चांदीच्या आणि पितळेच्या वस्तूंवर घासा. त्यामुळे या वस्तूंची लकाकी अधिक काळ टिकेल. दिवाणखान्यात जर सुगंधी मेणबत्त्या लावल्यात, तर ओलसरपणामुळे येणारा कुबट वास जाण्यास मदत होईल.

विद्युत उपकरणांची देखरेख
इलेक्ट्रिशियनला बोलावून घरातील वायरिंग आणि इलेक्ट्रिकल जोडणी तपासून घ्या. खराब झालेल्या वायर्स लगेचच बदला. कुठल्याही विद्युत पॉइंटमध्ये वीजेचा अतिरिक्त दाब नाही याची खात्री करून घ्या. एकाच वेळी अनेक विद्युत उपकरणांचा वापर करताना जर तुम्ही मल्टिप्लग बार वापरत असाल तर त्याद्वारे शॉर्ट सर्किट होऊ शकते. पावसाळ्यात प्रामुख्याने जर तुमच्या भिंतींमध्ये ओल असेल तर ही गोष्ट जोखमीची ठरू शकेल.

हवामानापासून रक्षण करणारा रंग (वेदर प्रूफ पेंट)
घरच्या भिंती कोरड्या आणि स्वच्छ राहाव्यात, याकरता नेरोलॅक एक्सेल टोटल हा रंग वापरा. दक्षिणेकडील विषुववृत्तीय प्रदेशांपासून उत्तरेकडील समशीतोष्ण प्रदेशांपर्यंत… आपला देश म्हणजे अत्यंत वेगवेगळ्या हवामान प्रदेशांचे घर आहे. अशा अत्यंत विविधांगी भूगोल असलेल्या देशात, वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड हे देशभरातील ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे वेदर प्रूफ पेंट उपलब्ध करून देण्याकरता मदत करतात. भिंतींमध्ये झिरपणारे पाणी भिंतींचा सर्वात मोठा शत्रू आहे, पण अत्यंत उष्मा आणि मोठ्या प्रमाणावरील धूळ ही देखील वेगवेगळ्या प्रदेशांतील घरांसमोरील आव्हाने आहेत.
रंगकाम करताना रंगारी ओल तपासणारे मॉइश्चर मीटर वापरतोय का, हे तपासून घ्या. त्यामुळे भिंतींचा पृष्ठभाग तपासून त्या जागी ओल राहिली आहे का, हे जाणून घेता येते. वेदर-प्रूफिंग केल्याने बुरशी वाढण्यास प्रतिबंध करता येतो.
जर आपल्याकडे भलीमोठी छत्री असती तर गोष्टी किती सोप्या झाल्या असत्या नाही! तोपर्यंत या साध्या सोप्या क्लृप्त्यांचा उपयोग करून तुमचे घर पावसाळ्याला सामोरे जाण्याकरता सज्ज करू शकता!.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


.