मुंबईतल्या 2000 सालानंतरच्या झोपड्यांना बीएमसी करणार पाणीपुरवठा

June 17, 2016 5:25 PM0 commentsViews:

mumbai-domestic-airport_f6d397f8-1b92-11e6-a451-36c3a3fdf989

मुंबई- 17 जून : मुंबईतील सगळ्या अनधिकृत झोपडपट्‌ट्यांमध्ये आता महापालिका अधिकृतपणे पाण्याचं कनेक्शन देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

2000 सालानंतरच्या झोपडपट्यांना पाणीपुरवठा का केला जात नाही असा सवाल हायकोर्टाने मुंबई पालिकेला केला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे मुंबईतील लाखो झोपडपट्टीधारकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

येत्या वर्षभरात मुंबई पालिकेच्या निवडणुका होतायत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय अतिशय महत्वाचा मानला जातोय. याआधी मनसे, शिवसेना आणि भाजप यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र आता मनसे वगळता भाजप-शिवसेनेने यु-टर्न घेत या प्रस्तावाला समर्थन दिलं आहे. तर अनधिकृत झोपड्यांना पाणी देण्याच्या प्रस्तावात जाचक अटी आणि शर्थी असल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षानं तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, मनसेनं अनधिकृत झोपड्यांना पाणी देण्यास तीव्र विरोध केलाय. यामुळे परप्रातियांचे लोंढे वाढतील अशी भीती मनसेने व्यक्त केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close