आजपासून पेट्रोल महागणार

April 1, 2010 8:49 AM0 commentsViews: 2

1 एप्रिल देशातील 13 शहरांमध्ये आजपासून पेट्रोल महाग होणार आहे. या शहरांमध्ये आजपासून युरो 4 ग्रेडचे पेट्रोल मिळणार असल्याने ही भाववाढ होत आहे. पेट्रोल 50 पैसे तर डिझेल 26 पैशांनी महागले आहे. पण या 13 शहरांमध्ये नवीन युरो नॉर्म लागू झाल्याने अनेक कार कंपन्यांना त्यांच्या गाड्यांची जुनी मॉडेल्स आता या शहरांत विकता येणार नाहीत. यात मारुती 800, फोर्ड आयकॉन, शेव्हर्ले टवेरा, फिएट पालियोच्या काही मॉडेल्सचा समावेश असेल. या कंपन्या आता युरो फोर स्टॅण्डर्डची मॉडेल्स तयार करतील. पेट्रोल – डिझेलसोबतच आज पासून आणखीन काय काय महाग होणार आहे त्यावर नजर टाकूयात…कार्सस्मॉल कार – रु. 2000लक्झरी कार – रु. 71,000स्टील- किंमती 40%नी वाढतीलहाऊसिंग- हाऊसिंग क्षेत्रात हाऊसिंग प्रोजेक्टसवरील सर्व्हिस टॅक्स 10 टक्क्यांनी वाढेलफर्टिलायझर- युरियाच्या किंमती आजपासून 10 टक्क्यांनी वाढतीलकन्झ्युमर गुड्स- टीव्ही, ए.सी, फ्रीजसारख्या वस्तू आजपासून महागतीलइतर वस्तू-मसाले, मिरची सारख्या इतर वस्तूही आजपासून महागतील.

close