धक्कादायक! कल्याणजवळ एक्स्प्रेसमधून तरुणीला फेकलं बाहेर

June 17, 2016 10:49 PM1 commentViews:

Gorakhpur2341

मुंबई- 17 जून :  गोरखपूरहून मुंबईकडे येणार्‍या एक्स्प्रेसमधून एका तरुणीला बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना कल्याण- ठाकुर्ली रेल्वे स्टेशनांदरम्यान घडली आहे. रेखा नवले (22) असं या तरुणीचं नाव असून तिच्यावर फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

रेखा आपल्या आईसोबत मुंबई गोरखपुर एक्स्प्रेसच्या महिला बोगीमधून प्रवास करत होती. याच दरम्यान, कल्याण स्टेशनातून एक्स्प्रेस सुटत असताना दिनेश यादवने आपल्या पत्नीसह लेडीज डब्यात चढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रेखा आणि तिच्या आईने त्याला विरोध करत खाली उतरण्यास बजावलं. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक आणि झटापट झाली. त्यावेळी तरुणाने रेखाला ट्रेनबाहेर फेकलं. त्यात ती जखमी झाली आहे. तर दिनेश यादव याच्यावर डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला 20 जून पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

दरम्यान, एक्स्प्रेस गाड्यांमधील महिला डब्यातील सुरक्षेबाबत अनेकदा चर्चा झाली आहे. पण त्याबाबत रेल्वे पोलिसांकडून ठोस पावलं उचलली जात नसल्याचं या घटनेतून पुन्हा उघड झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Amit

    he haramkhor bhaiyya loka mumbai chi purna vat lavtayat ani apan asech sahan kartoy tya mulila train madhun baher fekun khup motha parakram kela ka tya bhaiyyani asya news publish kelyapeksha tya bihari babuvar karvai kara.

close