महापालिका क्षेत्रात नवीन डंपिग गाऊंडला परवानगी नाही- मुख्यमंत्री

June 17, 2016 6:00 PM0 commentsViews:

devendra-fadnavis-09872

मुंबई- 17 जून :  महापालिका क्षेत्रात नवीन डम्पिंग गाऊंडला परवानगी देणार नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. स्मार्ट सिटी परिषदेसाठी मुख्यमंत्री कल्याणमध्ये आले होते. तेव्हा त्यांनी ही घोषणा केली आहे.

यापुढे कोणत्याही महापालिका क्षेत्रात नवीन डंपिग ग्राऊंड ला परवानगी देणार नसल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मागील अनेक महिने मुंबई ठाणे कल्याण येथील डम्पिंगला एका मागून एक लागणार्‍या आगीने डम्पिंगचा प्रश्न जटील झाला होता. त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु असतानाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे कोणत्याही महापालिका क्षेत्रात नवीन डंपिग ग्राउंडला परवानगी देणार नसल्याची महत्वपूर्ण घोषणा केली. कचर्‍याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करावी जेणे करून नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कल्याण इथे SRA क्लस्टरच्या माध्यमातून गरिबांना घरं द्यावीत परंतु अनधिकृत बांधकामांना आळा घालावा असे आदेश देखील त्यांनी यावेळी दिले. राज्यात आणखी 10 स्मार्ट सिटी उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली. अन्य शहरांप्रमाणे कल्याण डोंबिवलीमध्ये देखील SRA आणि क्लस्टर च्या माध्यमातून विकास करावा पण तसं करत असताना अवैध निर्माणांवर लक्ष द्यावं लागेल अशी सूचना त्यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close