सानियाच्या लग्नाला शिवसेना आणि सपाचा विरोध

April 1, 2010 10:21 AM0 commentsViews: 3

1 एप्रिलटेनिसपटू सानिया मिर्झाच्या लग्नाचा विषय आता महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत पोहोचला आहे. सानियाच्या लग्नावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. सेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी विधानपरिषदेत हा आक्षेप घेतला. मुलींना विवाहात फसवण्याचे गुन्हे वाढत आहेत. त्यामुळे पोलिसांनी याबाबत कारवाई करावी, अशी मागणीच गोर्‍हे यांनी केली. तर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनीही या लग्नावर नाराजी व्यक्त केली आहे.भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न करणार आहे. ही बातमी आल्यापासूनच त्याविषयी वादविवाद सुरू झाले आहेत. बजरंग दलाने अगोदरच या विवाहाला विरोध दर्शवला आहे. सानिया भारतीय असताना, ती पाकिस्तानातील व्यक्तीशी लग्न का करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होते. आता शिवसेनेनेही याच पद्धतीने विरोध दर्शवला आहे. लाहोरमध्ये शोएबच्या कुटुंबीयांनी मात्र या लग्नाबद्दल जल्लोष केला आहे. सानियाने पाकिस्तानकडून खेळावेटेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तानकडून टेनिस खेळावे, अशी अपेक्षा पाकिस्तानच्या टेनिस फेडरेशनचे चीफ दिलावर अब्बास यांनी व्यक्त केली आहे. आपण भारताकडूनच टेनिस खेळणार असल्याचे सानियाने याआधीच स्पष्ट केले आहे. पण सानिया पाकिस्तानकडून टेनिस खेळली तर पाकिस्तानमधील तरूण खेळाडूंना ती प्रेरणा देऊ शकेल, असे दिलावर यांनी म्हटले आहे. तसेच पाक टेनिस खेळाडू एसाम कुरेशीसोबतही तिने डबल्समध्ये खेळावे असेही मत दिलावर यांनी व्यक्त केले आहे.

close