अभिनेत्री ममता कुलकर्णीचा ड्रग्ज तस्करीतील सहभाग उघड

June 18, 2016 2:13 PM0 commentsViews:

mamtakulkarni6 18 जून :   इफ्रेडीन पावडरच्या आंतरराष्ट्रीय तस्करीप्रकरणी ठाणे पोलिसांनी आज एक मोठा खुलासा केला आहे. बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला आरोपी ठरविण्यात आले असून, तिच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली.

दोन महिन्यांपूर्वी ठाणे पोलिसांनी या आंतरराष्ट्रीय तस्करीचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर केलेल्या तपासात पोलिसांना ममता कुलकर्णी विरोधात सबळ पुरावे मिळाले आहेत.

पोलिसांना ममतावर आत्तापर्यंत फक्त संशय होता. परंतु, ती या कटात सामील होती, अशी विश्वसनीय माहिती पोलीस तपासात समोर आली. सोलापूर इथल्या अवोन लाईफ सायन्सेस या कंपनीच्या एकूण शेयर्स पैकी 11 लाख शेयर्स हे 26 रु प्रती शेयर च्या दराने ममताच्या नावावर वळविण्यात येणार होते. डॉ. अब्दुला हे आणखी एक नाव या तपासात पुढे आले आहे.

डॉ. अब्दुल्ला हा आफ्रिकेत राहत असून, अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीत त्याचं मोठं नाव आहे. 8 जानेवारी रोजी केनिया येथे झालेल्या एका बैठकीत अवोन लाईफ सायन्सेसच्या मनोज जैन, जय मुखी, किशोर राठोड, विकी गोस्वामी, ममता कुलकणच्, डॉ. अब्दुला आणि त्याचे दोन साथीदार उपस्थित होते. सदर बैठकीत एफिड्रिनचा साठा बाहेर काढून कसा वितरीत करायचा आणि ममता कुलकणच्च्या नावावर किती शेयर करायचे या विषयी चर्चा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close