आरबीआयच्या गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्वीकारण्यास रघुराम राजन यांचा नकार

June 18, 2016 8:58 PM0 commentsViews:

Raghuram-Rajan-PressMumbai1PTI

18 जून :  ‘रिझर्व बँक ऑफ इंडिया’ (आरबीआय) चे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दुसरी टर्म स्वीकारणार नसल्याचं सांगत सर्वांनाच धक्का दिला आहे.

भाजपचे नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी रघुराम राजन यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत त्यांच्यावर टीका केली होती. कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणारे राजन या टीकेनंतर नाराज झाले होते. आज त्यांनी आरबीआयची दुसरी टर्म स्वीकारणार नसल्याचे पीटीआयशी बोलताना स्पष्ट केलं. त्यामुळे हा मोठा धक्का मानला जात आहे. जागतिक मंदीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्याचं काम राजन यांनी केले आहे. त्यामुळे अशा स्थितीत त्यांनी दुसरी टर्म स्वीकारण्यास नकार देणं, हे चिंताजनक मानले जात आहे.

अच्छे दिनचे स्वप्न दाखविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजन यांच्याबाबत काय निर्णय घेतील? तसेच त्यांना दुसर्‍या टर्मसाठी कोणत्या पद्धतीने विनवणी करतील, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. राजन यांच्या घोषणेमुळे अर्थ आणि उद्योग क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा