कोकणातून नाही तर पूर्व विदर्भातून मान्सून राज्यात दाखल

June 18, 2016 9:23 PM0 commentsViews:

 

18 जून : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मॉन्सूनचे अखेर आज (शनिवारी) महाराष्ट्रात आगमन झालं. पण एरवी अरबी समुद्रातून महाराष्ट्रात दाखल होणार्‍या मान्सूनने यंदा बंगालच्या उपसागरातून राज्यात एन्ट्री घेतली आहे.

Monsoon india

त्यामुळे यंदा कोकणातून नाही तर पूर्व विदर्भातून मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. गेले अनेक दिवस गोव्यापर्यंतच रेंगाळणार्‍या मॉन्सूनची आगेकूच शुक्रवार रात्रीपासून सुरू झाली.

दरम्यान, मान्सूनचे हे वारे येत्या 48 तासांत महाराष्ट्रभर पसरतील, असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. तसंच अरबी समुद्रातूनही मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल, असे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close