दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम बदलणार

April 1, 2010 10:27 AM0 commentsViews: 24

1 एप्रिलशालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. दहावी आणि अकरावीचा गणित, विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम बदलणार आहे. केंद्रीय बोर्डाप्रमाणे हा अभ्यासक्रम बदलणार आहे. जून 2011 पासून हा अभ्यासक्रम बदलेल. त्याचबरोबर 12वीचाही गणित आणि विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम बदलणार आहे. बारावीचा हा अभ्यासक्रम 2012 पासून बदलेल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेत केली आहे.

close