मुंबई रस्ते घोटाळा प्रकरणी आणखी दोघांना अटक

June 19, 2016 1:25 PM0 commentsViews:

19 जून : मुंबईतल्या रस्ते घोटाळा प्रकरणी आज आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. कंत्राटदारांच्या 2 कर्मचार्‍यांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे आर के मधानी आणि के आर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अभियंते आहेत. या दोघांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

mumbai_raodयाआधी मागील आठवड्यात बुधवारी रस्ते घोटाळ्याला जबाबदार असणार्‍या दहा लेखा परीक्षकांना अटक करण्यात आली होती. कंत्राटदारांनी दिलेली बिलं न पडताळता महापालिकेला सादर केल्याचा आरोप लेखा परिक्षकांवर आहे. मुंबईतील रस्ते बांधणीत 352 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीने मुंबईतील 34 रस्त्यांची पाहणी केली होती. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, काम अपूर्ण ठेवणे यांसह अनेक गंभीर बाबींचा उल्लेख या समितीने आपल्या अहवालात केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close