भाजप कार्यकारणीत कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा !

June 19, 2016 1:39 PM0 commentsViews:

पुणे – 19 जून : भाजप कार्यकारणीचा आज दुसरा दिवस आहे. या निमित्तानं काही राजकीय ठराव मांडले गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला.

bjp_karyakarni_puneभाजप आमदार आणि खासदारांनीही ही मागणी उचलून धरली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कायम बाळासाहेबांचा आदर केला, पण त्यांचे वारसदार आम्हाला निजामाची औलाद म्हणून टीका करतात, अशी टीका आपण सहन करतोच कशी असा संतप्त सवालही भाजप कार्यकर्त्यांनी केला.

पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होताहेत, त्या निवडणुका भाजपनं स्वबळावर लढवाव्यात असा मतप्रवाह जोर धरू लागलाय.

मात्र, स्वबळावर निवडणुका लढवण्याची मागणी करण्यापूर्वी शिवसेनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा ठराव मांडण्यात आला. दरम्यान, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. ते काय सांगतात, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close