शिवसैनिकांकडून शिव जलक्रांतीचे ‘पाणी’ बाळासाहेबांना अर्पण

June 19, 2016 1:57 PM0 commentsViews:

मुंबई – 19 जून : शिवसेनेनं राबवलेल्या शिव जलक्रांतीच्या यशामुळे दुष्काळग्रस्त उस्मानाबादेत बंधारे तुडुंब झाले आहे. आज सुवर्ण महोत्सवी दिनाच्या निमित्ताने उस्मानाबादेतील शिवसैनिकांनी या बंधारेचे पाणी बाळासाहेबांना स्मृतीस्थळी येऊन अर्पण केले आहे.

sena444दुष्काळाची भीषण दाहकता सहन करणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेने शिव जलक्रांती योजना राबवली आणि यशस्वीही करून दाखवली. पहिल्या पावसातच या योजनेअंतर्गत नदी, कालवे पाण्याने भरून गेले. गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच इथल्या गावकर्‍यांना पुरेसे पाणी उपलब्ध झाले. शिवसेनेच्या आजच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनाचं औचित्य साधून उस्मानाबाद परांडा येथील गावकर्‍यांनी शिवजलक्रांती योजनेतील पाणी कलशामधून मुंबईत आणलंय. शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर परांडा येथील शिवजलक्रांती योजनेतील पाणी गावकर्‍यांनी कलशातून अर्पण केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close