रघुराम राजन यांच्यानंतर गव्हर्नरपदी कोण ?

June 19, 2016 2:18 PM0 commentsViews:

19 जून : रघुराम राजन यांनी आरबीआय गव्हर्नर म्हणून दुसरा कार्यकाळ भूषवणार नसल्याचं स्पष्ट केलंय. आरबीआय कर्मचार्‍यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रामध्ये त्यांनी पुन्हा गर्व्हनर बनणार नसल्याचं स्पष्ट केलंय. चार सप्टेंबरला कार्यकाळ संपल्यानंतर ते पुन्हा शैक्षणिक क्षेत्राकडे वळणार आहेत. आता त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली आहे.

raghuram_rajan1--621x414रघुराम राजन गर्व्हनरपदी राहणार की, जाणार यावरुन माध्यमांमध्ये बरीच चर्चा रंगली होती. आरबीआय गर्व्हनर म्हणून आपली जबाबदारी चोख बजावताना त्यांनी वेळोवेळी सरकारचे कान टोचले. त्यावरुन सरकार आणि त्यांच्यामध्ये मतभेद असल्याचे चित्र निर्माण झालं होतं. पत्रकारांनी पंतप्रधान मोदींना रघुराम राजन यांना मुदतवाढ देण्यासंबंधी थेट प्रश्न विचारला होता. त्यावर मोदींनी प्रशासकीय निर्णय सरकारलाच घेऊ दे असे उत्तर दिले होते. खासदार सुब्रमण्यम स्वामींनी तर रघुराम राजन यांच्यावर तिखट शब्दात टीका करताना त्यांना पदावरुन हटवण्याचीही मागणी केली होती. काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या काळात राजन यांची नियुक्ती झाली होती. आणि आता राजन हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आता त्यांच्यानंतर 8 नावांची चर्चा रंगली आहे.

पुढचे आरबीआय गव्हर्नर कोण?

1. अरुंधती भट्टाचार्य – चेअरमन, स्टेट बँक ऑफ इंडिया
2. उर्जित पटेल – डेप्युटी गव्हर्नर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
3. कौशिक बसू – चीफ इकॉनॉमिस्ट, जागतिक बँक
4. सुबीर गोकर्ण – एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
5. राकेश मोहन – माजी डेप्युटी गव्हर्नर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
6. अशोक लाहिरी – माजी मुख्य आर्थिक सल्लागार
7. विजय केळकर – माजी अर्थ सचिव
8. पार्थसारथी शोम – अर्थमंत्र्यांचे माजी सल्लागार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा