नानावटी आयोग बोलावणार मोदींना चौकशीला

April 1, 2010 11:08 AM0 commentsViews: 2

1 एप्रिलगुजरात दंगल प्रकरणी नानावटी आयोगाने गुजरात हायकोर्टात निवेदन केले आहे. आवश्यकता पडल्यास नरेंद्र मोदी यांना चौकशीसाठी बोलवले जाऊ शकते, असे या निवेदनात म्हटले आहे. मोदी आणि काही मंत्र्यांना समन्स पाठवण्याची गरज नाही, असे नानावटी कमिशनने सप्टेंबरमध्ये म्हटले होते. मात्र हा निर्णय अंतिम नाही, असे आयोगाने हायकोर्टापुढे निवेदन दाखल केले आहे. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 17 जून रोजी होणार आहे.

close