विरेंद्र तावडेशी कोणताही संबंध नाही -मनोहर कदम

June 19, 2016 4:29 PM0 commentsViews:

manhor_kadam19 जून : डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आपण सनातनच्या साधकाला प्रशिक्षण दिले नाही. विरेंद्र तावडेशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्यावरील सगळे आरोप बिनबुडाचे आहेत असं सांगत निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम यांनी सीबीआयचे आरोप फेटाळून लावले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन संस्थेचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये थेट पोलीस अधिकार्‍यांचाच सहभाग असल्याचा संशय सीबीआयला आहे. याप्रकरणी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम यांचाही समावेश असल्याचा आणि त्यांनी सनातनच्या साधकांना प्रशिक्षण दिल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. यात फरार आरोपी सारंग अकोलकर, रुद्रगौडा पाटील, विनय पवार आणि प्रवीण निमकर यांना प्रशिक्षण मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर मनोहर कदम पहिल्यांदाच माध्यमापुढे आले आहेत.

माझ्यावरचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. सीबीआयच्या कोणत्याही चौकशीला जायची तयारी असल्याचंही मनोहर यांनी म्हटलंय. विरेंद्र तावडे यांचा माझा कोणताही संबंध नाही. हा विनाकरण मला बदनाम करण्याचं हे षड्‌यंत्र आहे असा आरोपही कदम यांनी केला. मनोहर कदम यांच्यावर या आधीही रमाबाई गोळीबार प्रकरणी आरोप झाले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा