पुण्यात आईची हत्या करून 25 दिवसांच्या बाळाचं अपहरण

June 19, 2016 6:29 PM0 commentsViews:

crime sceneपुणे – 19 जून : पुण्यात एका आईची हत्या करून 25 दिवसांच्या बाळाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडलीये. या प्रकरणी एका महिलेला अटक केली असून 2 महिला फरार आहे.

हडपसर परिसरात मधू रघुनाथ ठाकूर यांच्यावर तीन महिलांनी हल्ला केला. आणि त्यांच्या 25 दिवसांच्या बाळाचं अपहरण केलं.
3 महिलांनी या बाळाचं अपहरण केलंय, ज्यापैकी एकीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. मात्र तिच्या दोन महिला साथीदार फरार झाल्या आहे. ही मानवी तस्कारी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. हे बाळ सध्या हडपसर पोलीस ठाण्यात आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेची चौकशी सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा