बोगस लोकांच्या नादी लागू नका, सत्ता गेली तर कुणी विचारणार नाही -फडणवीस

June 19, 2016 6:42 PM0 commentsViews:

पुणे – 19 जून : आपली माणसं म्हणून तुमच्याकडे काम घेऊन येणार्‍यांच्या नादी लागू नका, ही बोगस लोकं असून कालपर्यंत तुम्हाला विचारत नव्हती उद्या जर सत्ता गेली तर तुम्हाला विचारणार नाही अशा कानपिचक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या.

पुण्यात भाजपचा कार्यकरणी मेळावा पार पडला. आज दुसर्‍या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, विनोद तावडे, रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. अलीकडेच भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला चांगलाच हादरा बसलाय. एकनाथ खडसेंचं उदाहण समोर ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे नेते, मंत्री आणि कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघडणी केली.

devendra_fadanvis44उपस्थिती असलेल्या अनेकांनी आधीचं युती सरकार बघितलं आहे. आता 15 वर्षांनंतर आपण पुन्हा सत्तेत आलोय. आता आपला अनुभव आहे. अनेक मित्र आपले बनता. अनेक नातेवाईक आपलं काम करून घेण्यासाठी आपल्याकडे येतात. आणि आपला कार्यकर्ता हा इतका संवेदनशील आहे. नातेवाईकांचं काम हे राष्ट्रीय काम समजून तो कामाला लागतो. पण मला असं वाटतं, हे आपलं काम नाहीये. तुमचा माणूस म्हणून आपलं काम करीन हे जे काही सांगायला येता. अशी लोकं बोगस आहे. अशा लोकांच्या नादी लागू नका, कालपर्यंत आपल्याला विचारत नव्हते उद्या सत्ता गेली तर ते तुम्हाला विचारणा नाही अशा कानपिचक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्यात. तसंच आपला पक्ष हा हवेवर निवडून येत नाही पक्ष संघटनेवर निवडूण येतो. भाजप ही संघटनात्मक कार्यकर्त्यांची ताकद असलेला पक्ष आहे. असं सांगत स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीच्या कामाला लागा अशी सुचना देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा