ठाणे ते सीएसटी लोकलची संख्या केली कमी, ठाणे, मुलुंड, नाहूरच्या प्रवाशांचे हाल

June 20, 2016 1:24 PM0 commentsViews:

Thane Crowd1

ठाणे – 19 जून : ठाणे ते सीएसटी लोकल फेर्‍या कमी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. यामुळे ठाणे स्टेशनवर नेहमीपेक्षा जास्त गर्दी झाली आहे. प्रवाशांची संख्या जास्त असूनही हा निर्णय घेतल्यानं प्रवासी चिडले आहेत.

ज्या गाड्या डोंबिवली आणि बदलापूरहून येतात, त्या गाड्यांमध्ये या अधिकार्‍यांनी चढून दाखवावं, अशा संतप्त भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. ठाणे, मुलुंड, नाहूर आणि भांडूपच्या प्रवाशांना ठाणे लोकल हा मोठा दिलासा असतो. त्यात किमान शिरता तरी येतं, पण आता ही संख्या कमी झाल्याने त्यांना नाईलाजाने कर्जत, कसारा, कल्याण, डोंबिवलीहून येणार्‍या गाड्यामधून प्रवास करावा लागणार आहे.

दरम्यान, फ्लॅटफॉम क्र. 3 वरच्या लोकल फ्लॅटफॉम क्र. 1वर फिरवण्यात आल्याने या फ्लॅटफॉम क्रं. 1 वर प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतोय, तसंच लोकल्स 10-15 मिनिटं उशीराने धावत आहेत. यामुळे ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचे खूपच हाल होत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा