वीरेंद्र तावडेने बंदूक बनवून देण्यास सांगितलं होतं – संजय साडवीलकर

June 20, 2016 6:10 PM0 commentsViews:

20 जून :  ‘अंधश्रद्धा निर्मुलन समिती’चे संस्थापक नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार संजय साडविलकरने, हत्या प्रकरणाविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातनचा साधक वीरेंद्र तावडे त्यांना कसा आणि कधी भेटला याचा खुलासा करत माझ्या साक्षीमुळे दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येचा गुढ उकलण्यात मदत होईल असं संजय साडविलकर यांनी IBN लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

KOL_SAKSHIDAR

‘माझा आणि तावडेचा संपर्क 2004 पासून आहे. मी तेव्हा हिंदुत्ववादी म्हणून कोल्हापूरात काम करत होतो. तेव्हा नुकतीच सनातनची संस्थेची कोल्हापूरात सुरूवात झाली होती. तेव्हा तावडे आणि त्यांच्या पत्नी कोल्हापूरात सनातनचे काम करण्यासाठी आले होते. म्हणून आम्ही परिचीत होतो. आम्ही एकत्र काम करत होतो. मात्र काही काळानंतर आमच्या भेटीत खंड पडला. अचानक 2008-09 च्या दरम्यान तावडे पुन्हा भेटीला आला. त्यांनी मला पिस्तुल बनवायचं असल्याचं सांगितलं. तसंच बंदूकाबरोबर मला 2 आक्रमक मुले हवे आहेत. त्या दोघांना प्रत्येकी 10 लाख रूपयेसुद्धा तयार आहे. जर त्या दोघांचाही बरेवाईट झाल्यास त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारीही स्वीकारू असा प्रस्ताव तावडेने माझ्याकडे ठेवला होता. त्यानंतर तो माझ्याकडे दोन मुलेही पाठविले होते. त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यासही सांगितले होते. पण त्यावेळी दाभोलकरांची हत्या करतील याची पुसटशी कल्पनाही मला नव्हती’, असं साडविलकरांनी सागितंल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा