निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा व्यापार्‍यांचा इशारा

April 1, 2010 11:40 AM0 commentsViews:

1 एप्रिल औरंगाबाद महापालिका हद्दीत जकात वसुलीला मुदतवाढ दिल्याने संतापलेल्या व्यापारी महासंघाने महापालिका निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. ड वर्ग महापालिकेत 1 एप्रिलपासून जकात रद्द करून त्याऐवजी स्थानिक संस्था कर लावण्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र औरंगाबाद महापालिका हद्दीत जकात वसुलीला मुदतवाढ मिळाल्याने व्यापार्‍यांनी त्याचा तीव्र निषेध केला. आता 11 एप्रिलला होणार्‍या महापालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतला आहे. शहरातील 50 हजार व्यापारी, त्यांचे कटुंबीय, तसेच कर्मचारी मतदान करणार नसल्याचे व्यापारी महासंघाने म्हटले आहे.

close