दहीहंडीसाठी थरांची मर्यादा नको, राज्य सरकार जाणार कोर्टात

June 20, 2016 9:41 PM0 commentsViews:

dahi handhi news

मुंबई –  20  जून :  दहीहंडीच्या थरांवर कोणतीही मर्यादा आणण्यात येऊ नये, या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात जाण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दहीहंडीसंबधीचे नियम शिथिल करण्यासाठी सरकार हायकोर्टात गोविंदा मंडळांची बाजू मांडणार आहे. दहीहंडीच्या थरांवर कोणतीही मर्यादा नसावी आणि दहीहंडी फोडताना 12 वर्षीय मुलांना सहभागी होता यावं, यासाठी सरकार कोर्टात बाजू मांडणार आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत आमदार ऍड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्रासमोर दहीहंडी आणि गणेशात्सव मंडळांची बाजू मांडली.

दहीहंडी उत्सवात 18 वर्ष वयाची अट पूर्ण करणार्‍या मुलांनाच सहभागी होता यावं असं मुंबई हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत. तसंच 20 फुटांपेक्षा दहीहंडीची उंची नसावी असे निर्बंध घातले होते. ही अटक शिथिल करुन 12 वर्षांवरील मुलांनी यात सहभागी होऊ द्यावे. तसंच गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तीकार यांची बाजू मांडून पोलीस आणि महापालिकेने त्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली. शेलार यांची मागणी मान्य करीत मुख्यमंत्र्यांनी मूर्तीकारांच्या मंडपांना परवानगी देण्यासाठी महापालिका आणि पोलीस आयुक्तांना सूचना केल्या.

दरम्यान, दहीहंडी फोडताना लहान मुलांचा समावेश करू नये तसंच 20 फुटांपेक्षा अधिक थर लावू नयेत, असे आदेश यापूर्वी मुंबई हायकोर्टाकडून देण्यात आले होते. या आदेशांचा भंग केल्याप्रकरणी कोर्टाने राज्य सरकार आणि दहीहंडी समितीचे अध्यक्ष आशीष शेलार यांना नोटीस बजावली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा