दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे

June 20, 2016 9:45 PM0 commentsViews:

virendra_tawade

20  जून :   अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेल्या डॉ. वीरेंद्र तावडे याला आज (सोमवारी) पुण्यातील न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तावडे याला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला परवानगी दिली.

पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तावडेला सोमवारी दुपारी कडोकटो बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवून देण्याची मागणी सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात केली. पण न्यायालयाने दाभोलकर हत्या प्रकरणात तावडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा निर्णय दिला. डॉ. दाभोलकर यांच्या खून प्रकरणाचा तावडे मुख्य सूत्रधार असल्याचे सीबीआयने म्हटलं आहे. तो तपासात सहकार्य करीत नसल्याचेही सीबीआयकडून न्यायालयात सांगण्यात आलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा