छेड काढणार्‍या दोन युवकांची हत्या

April 1, 2010 11:47 AM0 commentsViews: 1

1 एप्रिलपत्नीची छेड काढल्याने रागावलेल्या पतीने दोघा युवकांची हत्या केल्याचा प्रकार नागपुरात घडला. नागपुरातील कोराडी देवळाच्या परिसरात हा प्रकार घडला. कोराडी कॉलनीत राहणार्‍या जयराम चौधरी यांच्या पत्नीने रवींद्र अंबाडरे, वय 17 आणि राजू कनोजिया, वय 21 यांनी आपली छेड काढल्याचे पती जयरामला सांगितले. त्यामुळे हे दोघेजण मंदिर परिसरात झोपलेले असताना संतापलेल्या जयरामने कुर्‍हाडीने या दोघांवर हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी जयरामला ताब्यात घेतले आहे

close