गर्दीने ‘तुडुंब’ लोकलमध्ये महिलेनं दिला बाळाला जन्म

June 21, 2016 2:57 PM0 commentsViews:

mumbai_local333321 जून : पहिल्याच पावसामुळे मध्य रेल्वेचे बारा वाजले आहे. सकाळापासून मध्य रेल्वेवर सर्व गाड्या उशिराने धावत आहे. त्यामुळे सर्वच स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली असून लोकलही गर्दीने भरभरून वाहत आहे. याच गर्दीत लोकलमध्ये एका गर्भवती महिलेनं बाळाला जन्म दिल्याची घटना घडलीये. सुदैवाने बाळ आणि बाळांतीण दोघेही सुखरूप आहे.

मुंबईची लाईफलाईन म्हणजे मुंबईची लोकल…आज याच लाईफलाईनने पहिल्याच पावसात अक्षरश: हात टेकले. परिणामी लोकल ट्रेन उशिराने धावत आहे. प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांनी गर्दी आहे .यातच एका महिलेनं लोकलमध्ये एका बाळाला जन्म दिला. ही महिला दिवा येथील रहिवासी आहे. दिवा स्टेशन वरून या महिलेनं सीएसटीकडे जाणारी लोकल पकडली. या लोकल ट्रेन मध्येच या महिलेनं बाळाला जन्म दिला. त्यानंतर भांडुपला ही लोकल आल्यावर त्या महिलेला उतरवण्यात आलं. तिला सावित्रीबाई फुले रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं. बाळ आणि बाळांतीण दोघेही सुखरूप आहे. गर्दीने भरून वाहून या लोकलमध्ये प्रवाशांचे एकीकडे अतोनात हाल होत आहे आणि दुसरीकडे याच लोकलमध्ये एका लहानशा जीवाचा जन्म अशी वेगळी घटना घडलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा