प्रत्येक मुलाला मिळणार शिक्षणाचा हक्क

April 1, 2010 11:58 AM0 commentsViews: 21

1 एप्रिलआजचा दिवस शिक्षण क्षेत्रासाठी ऐतिहासिक आहे. कारण आजपासून देशातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळतोय. शिक्षण मिळवणे हा आता प्रत्येक मुलाचा हक्क असणार आहे. आणि जर 6 ते 14 वयोगटतील एखाद्या मुलाला शिक्षण नाही मिळाले, किंवा त्याने शाळा सोडली, तर त्यासाठी सरकारला जबाबदार धरले जाणार आहे. म्हणूनच आता सरकारपुढे याबाबत आव्हाने उभी राहणार आहेत. सगळ्यात आधी येत्या सहा महिन्यात 12 लाख शिक्षकांची भरती करावी लागणार आहे. तसेच सर्व प्राथमिक शिक्षकांना बी एड् डिग्री असणे बंधनकारक असल्याने त्यांच्या प्रशिक्षणासाठीही पावले उचलावी लागणार आहेत. तसेच येत्या तीन वर्षांत देशभरातील सर्व शाळांमध्ये वर्ग, वाचनालये आणि इतर मूलभूत गोष्टी बांधण्याचेही मोठे आव्हान सरकारपुढे आहे. या सर्व मुद्द्यांवर पंतप्रधान आज भूमिका मांडणार आहेत.

close