पाइपलाईन झोपडपट्टयांच्या विळख्यात

April 1, 2010 12:06 PM0 commentsViews:

उदय जाधव, मुंबई1 एप्रिल मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाइन फुटण्याचे प्रकार सध्या वाढत आहेत. मुंबईकरांना मिळणारे लाखो लीटर पाणी वाया जाते आहे. त्यामुळे पाईपलाइनच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या पाइपलाईनना झोपडपट्टयांचा विळखा पडला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनवरच लोकांनी संसार थाटलेत. तर काही ठिकाणी पाईपलाईनवरच बांधकामे करण्यात आली आहेत. तर अनेक ठिकाणी पाईपलाईनला खेटूनच घरे बांधण्यात आली आहेत. एवढेच नाही तर या पाईपलाईन्सच्या मेन्टेनन्ससाठी वापरण्यात येणार्‍या नॅरो गेज रेल्वेट्रॅकची अवस्था तर याहून भयंकर आहे. या ट्रॅकला लागून झोपडपट्‌ट्याच तयार झाल्या आहेत. त्यामुळे मेन्टेनन्स करणारी ट्राम यार्डमध्येच उभी असते. पाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी या ट्रॅकवरुन जाताना ट्रामला अपघात होण्याची भीती कायम असते. कारण ट्रॅकवरच अनेक ठिकाणी छोट्‌या पाईपलाइन लोकांनी बिनधास्तपणे टाकल्या आहेत. एवढेच नाही तर ट्रॅकशेजारीच पाणीगळतीही सुरू असते. या पाईपलाईनच्या मेन्टेनन्ससाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.पण एकंदरीतच पाईपलाईनच्या या अवस्थेकडे बीएमसीने वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात मुंबईवर पाण्याचे मोठे संकट ओढवू शकते.

close