अशीही पालिकेची श्रीमंती, 8.5 लाखाला पुस्तक केलं खरेदी !

June 21, 2016 5:26 PM0 commentsViews:

mumbai_palikaमुंबई – 21 जून : हल्ली पुस्तकांच्या किंमती वाढल्या आहेत असं आपण नेहमी ऐकतो. पण तरी एखादं पुस्तकं किती महाग असावं. 1 हजार, 2 हजार, परदेशातून मागणायचे झाल्यास काही हजार…पण मुंबईतल्या केईएम रुग्णालयानं वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थांसाठी चक्क 8.54 लाखाला एक पुस्तक खरेदी केलंय. तर त्याच यादीतली काही पुस्तकं ही 5.60 लाख 6 लाख अशी 25 प्रकारची पुस्तकं तब्बल दोन कोटी रुपये खर्चून खरेदी केली आहे.

मुख्य म्हणजे याच पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदी किंमती पाहिल्या तर त्या 40-50 हजार आहे. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी मुंबईल्या एका दुकानातून या पुस्तकांच्या किंमती मागवल्या तर त्या आणखीनच कमी आहेत. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ही पुस्तकं खरेदी केल्यानंतर आता हा खर्च मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे आणण्यात आला आहे. पुस्तकांच्या या किंमती बघून सर्वच नगरसेवकांचे डोळे विस्फारले आहेत. त्यामुळे ही लाखमोलाची पुस्तकं दिसतात तरी कशी हे आम्हालाही पाहायचंय अशी मागणी अनेक नगरसेवकांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा