जनगणना मोहीम सुरू

April 1, 2010 12:18 PM0 commentsViews: 2

1 एप्रिलमहत्त्वांकाक्षी राष्ट्रीय जनगणना मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यापासून या योजनेला सुरुवात झाली. जनगणना अधिकार्‍यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन, याची सुरुवात केली. या जनगणनेनंतर देशातील प्रत्येक नागरिकाला ओळखपत्र आणि विशिष्ट नंबर मिळणार आहे. देशातील 120 कोटी लोकसंख्येला एकाच डाटाबेसमध्ये आणण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. देशातील प्रत्येकाची वैयक्तिक माहिती पहिल्यांदाच सरकारकडे उपलब्ध असणार आहे. त्यानंतर सरकार प्रत्येक नागरिकाला विशिष्ट नंबर देईल. भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांच्याकडे या डाटाबेसची जबाबदारी असेल.

close