प्राण्यांची कॅटवॉक रंगली नागपूरमध्ये

October 13, 2008 4:04 AM0 commentsViews: 9

13 ऑक्टोबर, नागपूर – रॅम्पवर कॅटवॉक करणा-या मॉडेल्स आपण नेहमीच पाहतो. पण नागपूरमध्ये झालेल्या एका खास फॅशन शोमध्ये रॅम्पवर चालले काही खास मॉडेल्स. हे खास पाहुणे होते प्राणी आणि तेही कुत्रे.रंगबिरेगी लाईट्स आणि डी.जे च्या आवाजात रँम्पवर मोठ्या ऐटीत हे कुत्रे चालत होते. या शोमध्ये भाग घेणारे प्राणी एकापेक्षा एक होते.गेल्या पाच वर्षा पासून नागपुरमध्ये प्राण्यांसाठी हा फॅॅशन शो आयोजित केला जातोय.या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी या प्राण्याचे मालक वर्षभर आपल्या प्राण्यांना खास ट्रेनिंग देतात.प्राण्यांसाठी काम करणा-या 'पेटा' या संस्थेने या फॅशन शोचं आयोजन केलं होतं. या वर्षी प्राणी या शोमध्ये सहभागी झाले. या अनोख्या कार्यक्रमाचा प्रेक्षकांनीही आस्वाद घेतला. त्यावरचा रिपोर्ट शेजारच्या व्हिडिओवर क्लिककेल्यावर पाहता येईल.