भ्रष्ट मंत्र्यांविरोधात विखे पाटील करणार कोर्टात याचिका दाखल

June 21, 2016 6:54 PM0 commentsViews:

 
Vikhepatil21 जून : फडणवीस सरकारमधील 6 मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारमधल्या भ्रष्टाचाराबद्दल काँग्रेस मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी यासंबंधी सूतोवाच केलंय.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावे असलेली 5 एकर जमीन दडवल्याचे प्रकरण केवळ जमीन परत करून मिटणार नाही. महाजन यांनी हे अनावधनाने घडल्याचे जाहीर करून गुन्ह्याची कबुली दिली आहे. परंतु, कबुली दिल्याने गुन्हा माफ होत नाही. यासंदर्भात देखील न्यायालयाचे स्पष्ट आदेश असून, मालमत्ता दडवल्यास सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते, असे विखे पाटील यांनी सांगितलं. तसंच आम्ही विधानसभेत या भ्रष्टाचारावर आवाज उठवला पण काही उपयोग न झाल्याने आम्ही हे पाऊल उचललं असल्याचे ते म्हणाले. दरम्यान अभिनेता सलमान खानच्या वादग्रस्त वक्तव्याविषयी बोलताना , सलमानवर एफआआर दाखल केली पाहिजे असं ते म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा