महिला आरोपीची आत्महत्या

April 2, 2010 12:57 PM0 commentsViews: 1

2 एप्रिलएका महिला आरोपीने पोलीस ठाण्यात आत्महत्या केल्याची घटना मुंबईत घडली आहे. गोरेगाव पूर्व पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला. रचना साळवी असे या महिलेचे नाव आहे. फसवणुकीच्या गुन्ह्याखाली 25 वर्षांच्या रचना साळवीला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. काल रात्री रचना साळवीला अहमदाबाद पोलिसांच्या ताब्यातून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.

close