जुलै महिन्यात 12 दिवस बँका राहणार बंद

June 22, 2016 1:31 PM0 commentsViews:

bank_stirke22 जून : जुलै महिन्यात बँकांची कामं करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काही बँकांच्या विलिनीकरण होणार आहे. याविरोधात स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूरच्या कर्मचार्‍यांचं 12 आणि 28 जुलै रोजी देशव्यापी संप आहे. याशिवाय ऑल इंडिया बँक एम्पॉईज असोसिएशनचाही संप आहे.

स्टेट बँक वगळता ऑल इंडिया बँक एम्पलॉईज असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनच्या आवाहनानंतर एसबीबीजेसह इतर बँकांचा 13 जुलै रोजी देशव्यापी संप आहे. तर 29 जुलै रोजी युनाईटेड फोरम ऑफ बँक युनियनने आवाहन दिल्यानंतर एसबीबीजेसह अन्य सर्व बँकांचा बंद राहिल. तर प्रत्येक महिन्याप्रमाणे पहिल्या आणि चौथ्या शनिवार, रविवारी सुट्टी निश्चित आहे. तसंच 6 जुलै रोजी ईदची सुट्टी आहे. जुलै महिन्यात जवळपास 12 दिवस बँका बंद राहणार आहेत.

- अशा असतील सुट्ट्या!

- 9 जुलैला दुसरा, 23 जुलैला चौथा शनिवार
– 3, 10, 17, 24 आणि 31 जुलैला रविवार
– 6 जुलै रमजान ईदची सुट्टी
– 12 जुलै, 28 जुलैला स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूरचा संप
– 13 जुलैला देशव्यापी संपामुळे सर्व बँका बंद
– 29 जुलैला युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचा एक दिवसीय बंद


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा