गजानन पाटील लाच प्रकरणी खडसेंना क्लिन चीट, इतर प्रकरणात न्यायमुर्तींकडून होणार चौकशी

June 22, 2016 1:58 PM0 commentsViews:

khadse33322 जून : कथीत पीए गजानन पाटील लाच प्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना क्लिन चीट मिळाली आहे. लोकायुक्त एम. एल. तहलयानी यांची एकनाथ खडसे यांना या प्रकरणात क्लिन चिट दिली आहे. मात्र, इतर प्रकरणात खडसेंची न्यायमुर्ती दिनेश झोटिंग यांच्याकडून चौकशी होणार आहे.

एमआयडीसी भूखंड प्रकरण, दाऊद कॉल प्रकरणी एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. या आरोप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूती दिनेश झोटिंग हे आता एकनाथ खडसेंप्रकरणी चौकशी करणार आहेत. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांना एका प्रकरणात क्लिनचिट मिळाली आहे. पीए गजानन पाटील लाचप्रकरणी खडसे यांना हा दिलासा मिळालाय.

लोकायुक्त एम. एल. तहलयानी यांची एकनाथ खडसे यांना क्लिनचिट दिली आहे. कल्याणमधील जमीन प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे सचिव गजानन पाटील यांनी 30 कोटींची लाच मागितल्याची तक्रार लोकायुक्तांकडे करण्यात आली होती. तक्रारदार रमेश जाधव यांनी खडसेंविरोधात कारवाई व्हावी म्हणून लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. मात्र खडसेंना क्लिनचिट मिळाल्यानं दिलासा मिळाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा