महाराष्ट्रात ज्यू धर्मियांना मिळणार अल्पसंख्याकांचा दर्जा

June 22, 2016 4:23 PM0 commentsViews:

jews22 जून : महाराष्ट्रात ज्यू धर्मियांना आता अल्पसंख्याकांचा दर्जा मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आता ज्यू नागरीकांना त्यांची सरकार दरबारी नोंद करता येणार आहे. याआधी राज्यात मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध आणि पारशी या समाजांना अल्पसंख्याकांचा दर्जा मिळालेला आहे.

ज्यू समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता, त्याला आता यश आलंय. या दर्जामुळे आता ज्यूंना अल्पसंख्याकांसाठी असलेल्या सरकारी योजनांचाही लाभ घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. तसंच ज्यू धर्माच्या शिक्षणसंस्थाही स्थापन करता येणार आहेत. ज्यूं समाजाची संख्या राज्यात किती आहे याबबत निश्चित आकडेवारी सरकारकडे उपलब्ध नाही, पण राज्यात साडेचार हजारांच्या आसपास संख्या आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा