बजेटमधील निधी खर्चाविना

April 2, 2010 1:00 PM0 commentsViews: 5

आशिष जाधव आयबीएन लोकमत, मुंबई2 एप्रिलगेल्या बजेटमधले विकासकामांचे जवळपास 21 हजार कोटी रुपये खर्च झालेले नाहीत. राज्याची तिजोरी रिकामी झाल्याने राज्यसरकारला बजेटमध्ये मंजूर केलेले सर्व पैसे खर्च करता आले नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्यातील विकासकामे त्यातही सिंचनाच्या कामांना विशेष प्राधान्य देण्यात येते. गेल्या वर्षीच्या सुमारे एक लाख 24 हजार कोटींच्या बजेटमध्ये विकासकामांसाठी मोठी तरतूद करण्यात आली. पण मार्च अखेरीस राज्यसरकारने सर्व विभागांच्या मंजूर निधीमध्ये प्रत्येकी वीस टक्के कपात केली. त्यामुळे गेल्या बजेटमधील जवळपास 21 हजार कोटी रुपये राज्यसरकारला खर्च करता आले नाहीत. आता विरोधक सरकारला याबाबत जाब विचारत आहेत.उदाहरणच द्यायचे झाले तर गेल्या बजेटमध्ये पाटबंधारे कामासाठी 6 हजार 77 कोटी 83 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. पण निधी अभावी त्यातले एक हजार नऊशे 51 कोटी 62 लाख रुपये खर्च झाले नाहीत.त्यातील कृष्णा खोरे प्रकल्पाचे 477 कोटी 28 लाख रुपये, गोदावरी खोरे प्रकल्पाचे 199 कोटी 18 लाख रुपये, विदर्भ पाटबंधारे मंडळाचे 178 कोटी 74 लाख रुपये तापी खोरे प्रकल्पाचे 57 कोटी 80 लाख रुपये, कोकण पाटबंधारे मंडळाचे 88 लाख रुपये, जलक्षेत्र सुधार प्रकल्पाचे दोनशे 59 कोटी 30 लाख रुपये असे एकूण एक हजार 951 कोटी 62 लाख रुपये निधी पडून राहिला.साहजिकच आमदारांची सरकारविरोधात मोठी नाराजी आहे.तुटीचा अर्थसंकल्प सादर करायचा. त्यातही विकासकामांऐवजी इतर कामांवर मोठ्या प्रमाणात खर्च करायचा यामुळे आर्थिक वर्ष अखेरीस तिजोरीत चणचण निर्माण होते. त्याचा मोठा फटका राज्यातील विकासकामांना बसतो.या दुष्टचक्रातून महाराष्ट्र सरकार कधी बाहेर पडेल, असा प्रश्न आता जनतेला पडला आहे.

close