यापुढे रेल्वे अर्थसंकल्प सादर होणार नाही ?

June 22, 2016 4:54 PM0 commentsViews:

suresh_prabhu344दिल्ली – 22 जून : ब्रिटीश राजवटीपासून वेगळा रेल्वे अर्थसंकल्प मांडण्याची सुरू झालेली पद्धत नरेंद्र मोदी सरकार रद्द करण्याची शक्यता आहे. सरकारकडून नेमण्यात आलेल्या निती आयोगाने रेल्वे अर्थसंकल्प रद्द करण्याची शिफारसच केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा कदाचित शेवटचा अर्थसंकल्प ठरू शकतो.

निती आयोगाचे सदस्य बिबेक देबरॉय आणि विशेष अधिकारी किशोर देसाई यांनी एकत्रितपणे हा अहवाल बनवला आहे. निती आयोगाने यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाला निवेदन केले आहे. या निवेदनात रेल्वे अर्थसंकल्प बंद करण्यात यावा असं म्हणण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयानं रेल्वे मंत्रालयाकडून याप्रकरणी त्यांचं मत मागवलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा