भुजबळ काका-पुतण्यांना जामीन मंजूर, पण मुक्काम तुरुंगातच !

June 22, 2016 5:10 PM0 commentsViews:

मुंबई- 22 जून : महाराष्ट्र सदन आणि कलिना भूखंड घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना जामीन मिळालाय. मात्र ईडीच्या प्रकरणामुळे काका-पुतण्यांचा मुक्काम जेलमध्ये राहणार आहे. दोघांनाही पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आलाय. छगन भुजबळांना हा थोडासा दिलासा असला तरी त्यांचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्येच राहणार आहे.bhujbal_sameer_

गेल्या तीन महिन्यांपासून छगन भुजबळ आणि समीर भुजबळ आर्थर रोड कारागृहात आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आज हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी झाली. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासोबत पंकज भुजबळ यांनाही कोर्टात हजर राहण्यसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. अखेर कोर्टाने महाराष्ट्र सदन आणि कलिना भूखंड घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना जामीन मंजूर केलाय. दोघांनाही पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आलाय. . तर पंकज भुजबळांना 22 जुलैपर्यंत प्रत्यक्ष कोर्टात हजर राहण्याची सूट देण्यात आलीये. या दोन्ही प्रकरणात गीता जोशी आणि इरम शेख या इतर दोघा आरोपींनाही जामीन मिळालाय. जामिनासाठी कोर्टात धाव घेणार्‍यांना भुजबळांना हा दिलासा असला तरी ईडीने दाखलेल्या गुन्ह्यामुळे भुजबळांना कारागृहातच राहावं लागणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा