‘डॅडी’च्या डॅडीचे नाव उद्यानाला !, पालिकेकडून प्रस्ताव मंजूर

June 22, 2016 5:45 PM0 commentsViews:

gavali_dadyमुंबई – 22 जून : रस्ते,बगीचे, चौक यांना साधारणपणे एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची नावं देण्याची प्रथा असते. पण मुंबई महानगर पालिकेनं मात्र कुख्यात गुंड अरुण गवळीच्या वडलांचं नाव एका बगीच्याला देण्याचा प्रस्ताव संमत केलाय. गुलाब गवळी उद्यान असं या उद्यानाचं नाव असणार आहे.

अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी गुलाब गवळी यांचं नाव उद्यानाला देण्याचा प्रस्ताव दिला होता. जो महानगरपालिकेनं संमत केलाय. एकेकाळी अख्या मुंबईला ज्याच्या नावाने घाम फुटायचा त्या अरुण गवळीच्या वडलांचं नावं आता उद्यानाच्या फळीवर झळकणार आहे. याबाबत गीता गवळी यांना विचारणा केली तेव्हा याचा संबंध डॅडीशी जोडून नका, माझ्या आजोबांनी अनेक समाजकार्य केली आहे असा दावा केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा